संभाजी भिडे,मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करणार : गृहमंत्री देशमुख

पुणे/प्रतिनिधी

कोरेगाव भीमा प्रकरणी चार्जशीटचा प्रस्ताव मंजूर केला आहे. याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल,” असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येरवडा कारागृहाला भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले की येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे जेलची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. या कारागृहात वेगवेगळ्या प्रकारचे कैदी आहेत, त्यामुळे कारागृहाच्या रचनेचा विचार करण्यात येत आहे. याबाबत एक मॅाडेल तयार करण्यात आले आहे. त्यांचे सादरीकरण झालं आहे.  

अनिल देशमुख पोहोचले थर्टी फर्स्टसाठी पोलिस नियंत्रण कक्षात!

सगळ्यांना वेध लागले होते काल  थर्टी फर्स्ट मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे. पण पोलिस मात्र ‘थर्टी फर्स्ट’ची रात्र शांततेत पार पडावी, यासाठी सायंकाळपासूनच रस्त्यावर कडेकोड बंदोबस्त देत उभे असतात. नागरीकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या याच पोलिसांना खंबीर मानसिक आधार देण्यासाठी गुरूवारी दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांनीच पोलिस नियंत्रण कक्षात हजेरी लावली.

Leave a Reply

Your email address will not be published.