राज्यातील लोककलावंतांना अनुदान देण्यास मान्यता

मुंबई | राज्यातील लोककलावंतांना एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली असून, या संदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा, असे निर्देश दिले आहेत.

लोककलावंत, लोककला पथकाचे चालक,मालक, निर्माते यांना पुढील काळात आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी वर्षा निवासस्थान येथे सांस्कृतिक कार्य विभागाचे बैठक झाली.त्या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र कोड संसर्गाची लढा देत आहे.राज्यातील कोळी च्या पार्श्वभूमीवर राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आल्याने अनेक कलाकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे.हे लक्षात घेऊन राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे येथे जवळपास आठ हजार कलाकार असून, राज्यात उर्वरित जिल्ह्यात जवळपास 48 हजार कलाकार आहेत. त्या सर्व कलाकारांना प्रति कलाकार 5 हजार रुपये मदत देण्यात येणार असून, यासाठी जवळपास 28 कोटी रुपये खर्च होणार आहे. राज्यात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात विविध कला पथके कार्यरत आहेत.गोल्ड मुळे वर्षभरात प्रयोग न झाल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकटे उभी असून शाहिरी, खडीगंमत, संगीत बारी, तमाशा फड पूर्णवेळ, तमाशा फड हंगामी, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधिनाट्य, सर्कस आणि टुरिंग टॉकिज अशा जवळपास 547 संस्थातील कलाकारांना मदत करण्यात येणार आहे.

जवळपास 547 संस्थांतील कलाकारांना मदत करण्यात येणार असून, यासाठी सहा कोटी रुपये खर्च होणार आहे. याशिवाय राज्यातील कलाकारांचे सर्वेक्षण,कलाकार निवड आणि इतर अनुषंगिक खर्च यासाठी एक कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री देशमुख यांनी सांगितले.