‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,सर्वधर्म समभावाची नाही’- चंद्रकांत पाटील

पुणे/प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असतानाच चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एक वक्तव्य केलं आहे.

आधी केलेल्या वक्तव्यावर माध्यमांकडे स्पष्टीकरण देत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि,’छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली असं मी म्हणालो. याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशीन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं. त्यात चुकीचं काय? असा सवाल त्यांनी उपस्थिती केला आहे.

ते पुढे म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची पूजा केली आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म समभाव शिकवतो”.त्यामुळे आता चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात कशा प्रतिक्रिया उमटतायत हे पाहावं लागेल.