अखेर खडसेंची भाजपला सोडचिठ्ठी,राष्ट्रवादीत करणार प्रवेश

प्रतिनिधी/यंग महाराष्ट्र

जळगाव: महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे अखेर शुक्रवार दि.२३ ऑक्टोबर रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे भाजपावर नाराज असल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रेवशाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगली होती. भाजपावर नाराज असल्यामुळे त्यांनी सदर निर्णय घेतला आहे. खडसे यांनी आज भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसेंच्या निर्णयामुळे भाजपाचे बळ कमी होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. खडसेंसमवेत अजून कोण-कोण राष्ट्रवादीत प्रवेश घेणार याबद्दलही उत्सुकता कायम आहे.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली. शुक्रवारी दुपारी २ वाजता आपल्या समर्थकांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.