भाजपचे माजी खासदार बारामतीत शरद पवारांच्या भेटीला!

बारामती/प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अमर साबळे हे आज बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेतली.

अलीकडील काळात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप च्या नेत्यांमध्ये रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्यामुळे पवार,साबळे भेटीला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे.दरम्यान आपण बारामती दौऱ्यावर असताना शरद पवारांची सदिच्छा भेट घेतली असल्याची माहिती स्वतः माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे.

https://www.facebook.com/1418935438334570/posts/3173995149495248/?d=n

माजी राज्यसभा खासदार अमर साबळे हे पिंपरी चिंचवड मधील भाजपचे नेते असून ते बारामतीचे सुपुत्र आहेत.शिवाय त्यांना भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेवर देखील पाठविण्यात आले होते.