जिंतूर शहरात बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारू पकडली

जिंतूर/प्रतिनिधी

शहरातील बलसारोड परिसरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी (ता.१६) दुपारी तीनच्या सुमारास स्थानिक पोलिसांनी छापा टाकला असता एकजण अवैध दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले असता पोलीसांनी आठ हजार ६४० रूपयांची देशी,विदेशी दारू जप्त केली.

शहरातील बलसारोड परिसरात अवैध दारू विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बीट जमादार श्रीमती संगीता वाघमारे, कॉन्स्टेबल अरविंद धबडे यांनी सदरच्या ठिकाणी छापा मारला असता तेथे एकजण देशी,विदेशी दारू अवैध रित्या विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यास पकडून झाडाझडती घेतली असता आरोपीकडे भिंगरी देशी दारूचे दोन भाग बॉक्स,विदेशी दारू मॅकडाॅल अठरा सिलबंद बाटल दोन्हीची मिळून आदाजे आठ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी आरोपी आकाश वाकळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहीती पोलिस सूत्रांकडून समजली.