खडसेंच्या जाण्याने भाजपला फार मोठा फरक पडणार नाही-देवेंद्र फडणवीस

यंग महाराष्ट्र/प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून भाजप मध्ये नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर भाजप च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत.शुक्रवारी आपण राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.परंतु एकनाथ खडसे यांनी राजीनामा देत असताना.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.केवळ आणि केवळ फडणवीसां मुळेच आपण पक्ष सोडत असल्याचे सांगतानाच एकनाथ खडसे यांनी आपण भाजपच्या कोणत्या ही केंद्रीय नेतृत्वावर नाराज नसल्याचे देखील स्पष्ट केले.

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसां वर केलेल्या घणाघाती आरोपां विषयी देवेंद्र फडणवीसांना विचारले असता.एकनाथ खडसे हे आमचे मोठे नेते आहेत.पक्ष वाढवण्यात एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे.आज एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला तो दुर्दैवी असून मनाला वेदना देणारा आहे.

एकनाथ खडसे असो की कोणीही कार्यकर्ता असो एकदा तो भाजपमधून बाहेर पडला म्हणजे भाजपला फटका तो पडतोच पण खडसे गेल्यामुळे भारतीय जनता पक्षाला फार मोठा फटका बसणार नाही. एकनाथ खडसे यांनी मला एक खलनायक बनवलं असून याबद्दलच मौन मी लवकरच सोडेल.अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली