नवी मुंबईतील टेनिसपटू ईशा मोहिते उंचावत आहे महाराष्ट्राचे नाव

नवी मुंबई/माधवी संजय मांढरे

नवी मुंबई: नवी मुंबई येथील रहिवाशी असलेली बाल खेळाडू ईशा मोहिते टेनिसमध्ये महाराष्ट्राचे नाव उंचावत आहे. ईशा मोहिते दिल्ली पब्लिक स्कूल, नवी मुंबई या शाळेची विद्यार्थी असून ती सध्या इयत्ता सातवीत शिकत आहे. खेळ आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी ईशा उत्कृष्टरित्या सांभाळत आहे. महाराष्ट्रातील अंडर 12 कॅटेगरीमधील सर्वात उत्कृष्ट खेळाडूंपैकी ईशा एक आहे. पुढे जाऊन तिला टेनिसच्या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे.


कोविड- १९ लॉकडाऊन आधी ईशा भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित होत असलेल्या राज्यस्तरीय टूर्नामेंट्समध्ये सहभाग घेत होती. पण सध्या कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण जग सापडले असताना क्रीडा क्षेत्रही बंद पडले आहे. तरीसुद्धा ईशा आपले स्वास्थ्य जपण्यासाठी नियमितपणे व्यायाम करत आहे. त्याचबरोबर कोरोना वायरस संपून सगळंकाही पूर्ववत होण्याची वाट ती आतुरतेने बघत आहे, म्हणजे तिला पुन्हा कोर्ट मध्ये जाऊन टेनिस खेळता येईल. लॉकडाऊन मध्येही पुरेसा वेळ असल्याने ईशा आपली पाककलेची आवड जोपासत आहे. त्याचबरोबर ती केक बनवायला देखील शिकली आहे.