पडळकरांची जीभ पुन्हा घसरली,राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर केली खालच्या भाषेत टीका

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असतात.कधी शरद पवार कधी अजित पवार तर कधी महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांवर ते आपल्या खास शैलीतून टिकेचे बाण सोडत असतात.आता मात्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करत असताना आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली

सांगलीचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन पडळकरांनी टीका केली. मंत्री पाटील हा बिनडोक माणूस आहे, असे वादग्रस्त वक्तव्य पडळकर यांनी केले आहे.

पुढे पडळकर म्हणाले कि,जलसंपदा मंत्री आपल्या जिल्ह्यातील आहेत. ते डोके तिसरेकडे लावतात. त्यांचे जे खाते आहे, त्यात त्यांचे डोके लागत नाही. आपल्याला वाटते तो माणूस फार हुशार आहे. मात्र, तो एक नबंरचा बिनडोक माणूस आहे.असं वक्तव्य पडळकर यांनी केले आहे.कवठेमहाकाळ येथील नगरपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते.

दरम्यान,या आधी देखील पडळकरांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीने प्रचंड आक्रमक होऊन त्यांच्या विरोधात राज्यभर निदर्शने केली होती.आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री असलेल्या जयंत पाटील यांच्यावरील टिके नंतर राष्ट्रवादी पडळकरांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देते ते पाहावं लागेल