यंग महाराष्ट्राच्या वाचकांनी ई-मेल द्वारे पाठवलेल्या सुंदर गौराईचे संकलन

गणेश चतुर्थीनंतर गौरींचे आगमन होते. गौराई या माहेरवाशीण असतात आणि त्यांच्या कौतुकासाठी पूर्ण घर सज्ज होतं. गौरी आगमन, पूजन आणि त्यानंतर विसर्जन अश्या तीन दिवसांचा हा सण महाराष्ट्रातील विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आणि म्हणूनच ‘गौराई माझी लाडाची गं’ हा उपक्रम आम्ही राबवला. तुमच्या लाडक्या गौराईचे दर्शन अवघ्या महाराष्ट्राला घडावे हा या उपक्रमा मागचा हेतू होता. या उपक्रमाला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही पाठवलेल्या सर्व फोटोंपैकी काही निवडक उत्कृष्ट फोटो यंग महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर झळकणार आहेत. त्यामुळे आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका.

चला तर मग तुमच्या गौराईचे आणि त्या भोवती केलेल्या सुंदर आरासचे फोटो पाहुयात.