वर्दीतील स्त्रीशक्ती; महिला पोलीस संगीता ढोले

वाशिम/प्रतिनिधी

कोरोनाच्या लढ्यात आमच्या पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्या स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

बुद्धीचे,शक्तीचे,भक्ती-शक्ती,नीतीचे व कृषी संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या नवरात्र उत्सवाचे पवित्र पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे मला गरजेचे वाटते. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्त्रीशक्ती अनेक प्रकारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपत आहेत.

महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले वाशिम पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांनी भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्यापलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे.सामाजिक जाणिवेतून भटकंती करणार्‍या समाजातील मुलांना मोफत ज्ञानदानाचे काम करत आहेत. सामाजिक जाणिवेतून लोकाभिमुख कार्य करणाऱ्या संगीता ढोले यांचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणुन मला अभिमान आहे,तसेच मला मनस्वी आनंद होत आहे. असे गौरवोद्‌गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

महत्वाची बातमी