प्रकाश आंबेडकर काहीही चुकीचे बोलले नाहीत; खा.संभाजी राजे

प्रकाश आंबेडकर काहीही चुकीचे बोलले नाहीत; खा.संभाजी राजे
मुंबई/प्रतिनिधी

आज वंचित बहुजन आघाडीचे प्रनेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजन केल होत. त्यामध्ये त्यांनी एक राजा बिनडोक आहे. तर दुसऱ्या राजाची मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट नाही अशी खोचक टीका केली होती. या विधानामुळे संपूर्ण राज्यभरात याचे तीव्र पडसाद पहायला मिळाले. राज्यभरातुन मराठा समाजाने प्रकाश आंबेडकरांविरूद्ध संतप्त प्रतिक्रिया देत व निषेध करत असतांनाच प्रकाश आंबेडकर काहीही चुकीचे बोलले नसल्याची प्रतिक्रिया खा. संभाजी राजे भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे आज दिवसभरापासून पेटलेला हा वाद आता मिटण्याची शक्यता आहे.

खासदार संभाजी राजेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहु महाराज यांचे चांगले संबंध होते. प्रकाश आंबेडकर हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज असून ते जे काही माझ्याबद्दल बोलले ते चुकीच बोलले नाहीत असा खुलासा खासदार संभाजी राजे यांनी केला आहे. माझ्याबद्दल ते काहीही उलट सुलट बोलले नसून आमच्या बंधूंवर त्यांनी केलेले वक्तव्य हे अशोभनीय आहे. मला मनापासून ते आवडलेलं नाही. यापूढे त्यांनी असे बोलू नये.शेवटी देशात लोकशाही आहे. सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे.असेही ते मुलाखती दरम्यान म्हणाले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते वाचा सविस्तर…