प्रा.डॉ.संतोष हंकारे आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित

परभणी/प्रतिनिधी

बोरगाव, ता.लोहा जि.नांदेड येथील रहिवासी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव, ता.गंगाखेड जि. परभणी येथील मराठी विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष चंपती हंकारे यांना नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन इंग्लंड (UK) आणि चिंतामणी महाविद्यालय घुगूस जि.गडचिरोली यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सादर केलेल्या संशोधन लेख आणि एकंदरीत शौक्षणिक कार्यासाठी १९ जूलै २०२१ रोजी आतंरराष्ट्रीय बेस्ट टीचर- आवार्ड- 2021 ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांनी अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परीषदेत व चर्चासत्रात विविध विषयांवर पेपर वाचन केले असून विविध नियत कालीकातही त्यांचे 145 च्यावर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच ते स्वारातीम विद्यापीठात मराठी विषयाचे संशोधन मार्गदर्शक असून त्यांचे तीन ग्रंथही प्रसिद्ध आहेत. तसेच सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

यांना NHS (England) बेस्ट टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या महाविद्यालयाच्यावतीने संस्थेचे सचिव कृष्णाभैय्या दळणर, प्राचार्य. डॉ. उत्तम देवकते, डॉ.विठ्ठल डूमणर, प्रा.डॉ.नरसिंगदास बंग, प्रा.डॉ. काशीनाथ जाधव, प्रा. शंकर घाडगे यांनी अभिनंदन केले.

त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या महाविद्यालयाच्यावतीने संस्थेचे सचिव कृष्णाभैय्या दळणर, प्राचार्य.डॉ. उत्तम देवकते, डॉ.विठ्ठल डूमणर, प्रा.डॉ.नरसिंगदास बंग, प्रा.डॉ. काशीनाथ जाधव, अरविंद रायबोले, आर.जी.वाघमारे, देविदास एडके, एस.डी.हंकारे, संजय हंकारे, राहूल जोंधळे सर्व मित्र परिवाराच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.