डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर सिरीज; अभिनेता विक्रम गोखलेंची भूमिका वादात

मुंबई/प्रतिनिधी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित एक सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हि सिरीज ‘बाबा प्ले’ या ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित होणार असून अभिनेता विक्रम गोखले बाबासाहेबांची भूमिका साकारणार आहे.मात्र आता त्यांची हि भूमिका वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

अभिनेता विक्रम गोखले हे मागील काही दिवसांपूर्वीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आले होते.त्यामुळे ते आता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत असल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला असून.सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.गोखले सारख्या विकृत व्यक्तींना बाबासाहेबांची भूमिका देऊ नका अन्यथा सिरीज प्रदर्शित होणार नाही असा इशारा हि अनेकांनी समाज माध्यमांतून दिला आहे.त्यामुळे आता येत्या काळात याचे पडसाद कसे उमटतात हे पाहावं लागेल.

ही सीरिज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सीरिजचं नावं ‘आंबेडकर- द लेजेंड’ असे आहे.याची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन संजिव जैसवालने केले आहे. संजिव जैसवालचे ‘फरेब’, ‘अनवर’, ‘शुद्र- द रायझिंग’, ‘प्रणाम’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. संजिव या सीरिजविषयी म्हणाले, “आपले राष्ट्र हे समानतेकडे वाटचाल करत आहे. कारण या एका व्यक्तीमुळे आपला देश समानतेच्या मार्गावर चालत आहे. अशाच आंबेडकरवादींना हे ओटीटी प्लॅटफॉर्म समर्पित करत आहोत.”