शिवसेनेचा यु-टूर्न,राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जायला विरोध करणार नाही

मुंबई/प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळात वर्णी लागल्या नंतर महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या मतदार संघात जन आशीर्वाद यात्रा सुरु केली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आज मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला अभिवादन करून आपल्या जन आशीर्वाद यंत्राची सुरुवात केली आहे.

जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवाजी पार्क वर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेणार आहेत.राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाण्याचा कोणता हि नैतिक अधिकार नसल्याचं म्हणत नारायण राणेंना स्मृतिस्थळावर जाण्यापासून रोखू असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला होता.मात्र आता शिवसेनेने मवाळ भूमिका घेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाण्यास कोणता हि विरोध करणार नसल्याचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले आहे.शिवसेनेने घेतलेल्या या यु-टूर्न मुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.