जहांगीर नावावरून ट्रॉल करणाऱ्यांना स्वराचे उत्तर, “ट्रोलर्सना म्हणाली तुम्ही गाढव आहात”

मुंबई : बॉलिवूड कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खानच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवण्यात आले आहे. पण या नावावरून सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. या दाम्पत्याने आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलंय हे कळताच युजर्स या जोडीला ट्रॉल करत आहेत. आधी आपल्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर आणि आता छोट्या मुलाचे नाव जहांनगीर कोणत्या कारणाने ठेवले असा सवाल सोशल मेडिआ वापरकर्त्यांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहता, करीना कपूर खानची कोस्टर आणि जुनी मैत्रीण प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करने करीनाचे बाजू घेत यावर आपले मत व्यक्त केले आहे. 

स्वरा नेमकं काय म्हणाली?

करीनाच्या लहान मुलाच्या नावाबाबत स्वरा भास्करने एक विशेष ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये, तिने युजर्सना कामाशी काम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे ट्विटमध्ये तिने या सर्व ट्रोलर्सना गाढव म्हटले आहे. अभिनेत्री लिहिते, “एका जोडप्याने त्यांच्या मुलांची नावे ठेवली आहेत, आणि ते जोडपे तुम्ही नाही – पण नावे काय आहेत आणि का आहेत यावर तुमचे मत आहे आणि तुमच्या मनात हा प्रश्न आहे; ज्यामुळे तुमच्या भावना दुखावतात …. तर तुम्ही या जगातील सर्वात मोठ्या गाढवांपैकी एक आहात! ” या ट्विटच्या शेवटी अभिनेत्रीने करीनाच्या मुलाचे नाव जहांगीर लिहिले आहे. स्वराचेही ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि स्वराच्या या ट्विटमुलळे आता ती देखील ट्रॉल होत आहे.

स्वरालाही मिळतायेत युजर्सच्या हेट कमेंट्स 

नेटकरी म्हणाले की स्वरा केवळ तिच्या प्रसिद्धीसाठी अशा मुद्द्यांवर आपली विधाने देते. अश्या विधानांमुळे तिला चर्चेमध्ये राहण्याची संधी मिळते.