उद्या गंगाखेड रेल्वे स्थानकावरून धावणार नांदेड-पनवेल एक्स्प्रेस

परभणी/प्रतिनिधी

लॉकडाऊन मुळे बंद करण्यात आलेली प्रवासी सेवा रेल्वे प्रशासनाकडून आता हळू हळू सुरू करण्यात येत आहे. गंगाखेड येथील रेल्वे स्थानकावरून उद्या नांदेड – पनवेल एक्स्प्रेस धावणार आहे. मराठवाड्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. सणासुदीच्या काळात लोकांची गैरसोय टाळण्यासाठी ही सेवा चालू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

भारतात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून देशभरातील रेल्वे प्रवासी सेवा २३ मार्चपासून पूर्णपणे बंद होती. भारतीय रेल्वे सेवा सुरळीत सुरु करण्यासाठी १२ मे पासून ३० विशेष रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या रेल्वे गाड्याची बुकिंगसुद्धा आता आयआरसीटीसी च्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –