बारामतीतील शाळा चोरट्यांनी लुटली,पोलिसांनी ‘शाळा’ घेताच दिली गुन्ह्याची कबुली;तीन जण अटकेत

बारामती/ प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मौजे मुढाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील किंमती साहित्यांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पुणे ग्रामीण विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी कि रविवार दि.१२ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना.सदर पथकास गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि मौजे मुढाळे येथील जिल्हा परिषद शाळेतील साहित्यांची चोरी राजेंद्र जाधव आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून केली आहे.हि माहिती मिळताच पोलिसांनी राजेंद्र जाधव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता.त्याने हि चोरी साथीदारांच्या साहाय्याने केल्याची कबुली दिली.त्यानुसार पोलिसांनी आरोपी राजेंद्र मारुती जाधव,लक्ष्मण मल्हारी सकाटे,राहुल वसंत सकाटे यांना अटक करून वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात दिले असता.त्यांच्याकडून चोरीस गेलेले.कॉम्प्युटर स्क्रीन्स व शाळेतील मुलांचे पोषण आहाराची भांडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर ची कारवाई हि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे,पोलीस हवालदार रविराज कोकरे,असिफ शेख,पोलीस नाईक अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहिवळे,पोलीस हवालदार राजापुरे यांनी केली.