तिसऱ्या लाटेसाठी ऑक्‍सिजन पुरवठा तिप्पट करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे/प्रतिनिधी

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात बिनविरोध करण्याची आमची भूमिका होती. मात्र, काही जणांकडून अपप्रचार करण्यात आला. हवेली तालुक्‍यात आमच्याच विचाराचे दोघेही आहेत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. मात्र, सर्व जागा बिनविरोध करण्यास यश आले नाही. गेली 30 वर्षे बॅंक चांगली चालवण्याचे काम आम्ही करीत आहोत. चांगलं काम असेल तर लोक निवडून देतील.कोणी जातीयवाद करण्याचा प्रयत्न करीत आहेत,अशी टीका पवार यांनी विरोधकांवर यावेळी केली.