यंदाच्या IPL चे काय आहेत नवीन नियम ? जाणून घेण्यासाठी क्लिक करा

प्रतिनिधी/शुभम अहिवळे

कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले असताना.भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.कोरोनामुळे जगातील अनेक व्यवहार गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले होते.क्रीडा जगातला ही याचा फार मोठा फटका बसला होता.मात्र आता आयपीएल ला सरकारचा हिरवा कंदील मिळाल्या मुळे आता केंद्र सरकारच्या परवानगी नंतर भारतीय क्रिकेट संघ युएई मध्ये दाखल झाला आहे.आज पासून या आयपीएल च्या थराराला सुरुवात होणार आहे.आज पहिला सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जाणार आहे.परंतु यंदाच्या आयपीएल वर कोरोनाचे सावट असल्यामुळे सामन्यासाठी आणि खेळाडूं साठी काही नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

कोरोनामुळे आयपीएल चे बदललेले नियम

१)बॉल स्विंग करण्यासाठी थुकी वापरता येणार नाही.

२)या संदर्भात प्रत्येक संघाला दोन वेळा इशारा दिला जाईल .

३)तिसऱ्यांदा अशी चूक झाली तर विरोधी संघाला 5 धावा अतिरिक्त मिळतील.

४)त्याचबरोबर टॉस झाल्यानंतर कर्णधारांना एकमेकांसोबत हात मिळवता येणार नाही.

५)एखाद्या खेळाडूला करोना झाला तर त्याच्या बदली दुसऱ्या खेळाडूला संघात घेता येऊ शकते.

६)यंदा आयपीएलचा कालावधी 53 दिवसांचा असेल,गेल्या 2 हंगामात तो 3 दिवस कमी होता