खरा सेलिब्रेटी कोण? अजितदादांची एन्ट्री होताच विकी कौशलला दाखवला साईड कॉर्नर,व्हिडीओ व्हायरल

मुंबई/प्रतिनिधी

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे.या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरु असतानाच.अभिनेता विकी कौशल चा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया मध्ये व्हायरल होतोय.आपल्या विवाह सोहळ्यासाठी मुंबईहून राजस्थानला जातानाचा विकीचा हा व्हिडीओ त्याच्या मुळे नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे चर्चेत आला आहे.

विवाह सोहळ्यासाठी जात असताना विकी मुंबई विमानतळाच्या गेट वरती उभा होता. त्याचे फोटो काढण्यासाठी तिथे माध्यमांची गर्दी झाल्याचे दिसते आहे. या सर्वांसमोर विकी हात हलवून पोज देताना दिसतं आहे. मात्र व्हिडिओ नीट पाहिल्यास हे लक्षात येईल की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मागून येताना दिसत आहेत, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी विकी कौशलला बाजूला होण्यास सांगितले. अजित पवारांचे देखील तिकडे लक्ष गेले. मात्र अजित पवार आपल्या दैनंदिन कामाच्या धावपळीत थेट मोबाईलवरती बोलत तेथून निघून गेल्याचे दिसतं आहे.

https://fb.watch/9VDGQn0-VO/

सेलिब्रेटी दिसले कि अनेकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही.त्यांना बघण्यासाठी लोक वाटेल तिथं गर्दी करत असतात.अनेक राजकारणी आणि सेलिब्रेटींचे संबंध देखील आपल्याला माहिती आहेत.मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सगळ्याला अपवाद ठरले आहेत.या व्हिडीओ मध्ये असे दिसते आहे कि आपल्या रोजच्या कामाच्या व्यापात मोबाईलवर बोलत असताना अजितदादांचे ना विकी कौशल कडे लक्ष गेले ना त्याला पाहायला आलेल्या गर्दीकडे.त्यामुळे अजित पवारांच्या एका वेगळ्या अंदाजच प्रत्यय आल्याचे म्हणत त्यांच्या समर्थकांकडून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडिया मध्ये व्हायरल केला जातोय